Day: January 2, 2022
-
गावागावात वेळ अमावस्याची पूजा उत्साहात
Big9news Network बार्शी तालुक्यातील रातंजन येथील बापू दत्तू नागटिळक यांच्या शेतामध्ये वेळ आमावस्याची पूजा करण्यात आली.अतिशय आनंदमय वातावरणात शेतात साजरा करण्यात आली. त्यावेळी गौतम नागटिळक बिरु नागटिळक माधुरी नागटिळक , सीता डोळस , दिपाली चौधरी , दुर्गा नागटिळक, माया सुरवसे , गीता बनसोडे , कृष्णा बनसोडे , भैरवनाथ चौधरी , ममता वाघमारे, सोनू वाघमारे ,…
-
कीर्तनकारांनी समाज बदलाची चळवळ उभी करावी – येळेगावकर
Big9news Network अध्यात्म सेवा पुरस्कार ह.भ.प.श्याम जोशी यांना प्रदान सोलापूर-कीर्तन हे समाजप्रबोधनाचे साधन असून कीर्तनकारांनी त्यातून समाज बदलाची चळवळ उभी करावी,असे आवाहन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले. भंडारकवठे येथील सत्संग मंडळ व कुलकर्णी परिवार यांच्या वतीने ह.भ.प.अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा अध्यात्म सेवा पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे ह.भ.प.श्याम जोशी…
-
समाजसेवा हीच ईश्वरसेवा : डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य
Big9news Network समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या ईश्वराला पुजतच असतो. परंतु प्रत्यक्ष ईश्वर, साधुसंत आणि महापुरुषांनी माणसामध्येच ईश्वर पाहण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. त्यामुळे समाजातील व्यक्तीची सेवा ही ईश्वरसेवा ठरते असे प्रतिपादन होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. वीरशैव व्हिजनतर्फे काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी…
-
अशी ही सामाजिक बांधिलकी | महामानव संस्थेच्यावतीने अशोक नागटिळक यांचे वाढदिनी स्नेहग्रामला किराणा- धान्याची मदत
Big9news Network येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले. अशोक नागटिळक महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना मायेला ओलावा मिळावा, भूकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी…
-
पूर्व विभागातील खवय्या नागरिकासांठी पूर्वविभाग ‘चौपाटी’
सोलापूर दि.1/1/2022- दि.31/12/2021 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक नागेश लिंगराज वल्याळ यांच्या संकल्पनातून प्रभाग क्र.9 मध्ये पूर्व विभागातील खवय्या नागरिकासांठी पूर्वविभाग चौपाटी साकारण्यात आले असून त्यांचे लोकार्पण कार्यक्रम शहराअध्यक्ष विक्रम देशमुख व आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कर्णिक नगरकडे जाणारा रस्ता हा निर्मनुष्य व घाणीचा सम्राज्य असलेला रस्त्याच्या फुटपाटवर चौपाटीचा संकल्पना मा.आयुक्त यांच्याकडे…
-
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे
BIG9News सुरूवातीपासूनच अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांचे नाव आघाडीवर होते ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चतच मानली जात होती. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे. यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता-…
-
हैदराबाद रोडवर अपघात ; पादचारी व्यक्तीस उडवले
Big9news Network सोलापूर-हैदराबाद रोड येथील खान हॉटेल जवळ पायी चालत जात असणाऱ्या इसमास चारचाकी वाहन (क्रमांक AP28 DA 7091) या वाहनाने धडक दिली व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर जाऊन आदळल्याने चारचाकी वाहन पलटी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.