Big9news Network
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा सोलापूर महानगरपालिका गटनेते किसन भाऊ जाधव व नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या भांडवली विकास निधीतून आज सोलापूर महानगर पालिकेला रुग्णवाहिकेचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या प्रमुख हस्ते (पुणे येथून) व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे करण्यात आले.
पुणे येथून विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री मा ना.अजित पवार यांचे समवेत नगरसेवक किसन जाधव हे स्वतः उपस्थित होते. हा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित करताना सध्याच्या कोरोना महामारी च्या काळात तसेच मागील काही महिन्यात गरोदर महिला, अपंग तसेच रुग्णांना काहीवेळा ज्या त्रासाला सामोरे जावे लागले तो त्रास भविष्यात कमी होण्यासाठी अशा जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या आरोग्य सेवांच्या मदतीसाठी सदर रुग्णवाहिका ही कायम एक मदतीचा हात ठरणार असल्याचे सांगत किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आदरणीय दादांनी यावेळी “मला स्वतःला ह्या कार्यक्रमाला हजर राहायचे होते पण काही महत्त्वाच्या शासकीय बैठका मुळे सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने करण्यास सांगितले” असे विशेष नमूद केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे आयोजित कार्यक्रमाला मनपा आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर , चेतन गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम, काँग्रेस गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक रियाझ खरादी, उपमहापौर राजेश काळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका सुनीता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे, लता फुटाणे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे आदी मान्यवरां समवेत पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या हस्ते सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. अत्यंत सुनियोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे हिने तर आभार प्रदर्शन सुहास कदम यांनी केले.