Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

Big9news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज एकाच दिवशी 40 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 96 जण बरे झाले परंतु 3 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.
आज शनिवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर कोरोना स्थितीची माहिती घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार एक जून नंतर लॉक डाऊन मध्ये शिथिलता आणण्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले

सोलापूर शहरात आज शनिवारी दि.22 मे रोजी कोरोनाचे नवे 40 रुग्ण आढळले असून यामध्ये 21 पुरुष तर 19 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 3135 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 3075 निगेटिव्ह तर 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 96 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *