Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

BIG 9 NEWS NETWORK

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला असून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे रायगड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून यामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ओसरायला लागल्यानंतर याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफ आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच बचावकार्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. पण सायंकाळी हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवण्यात अडथळे आल्याने गुरूवारी मदत पोहचवता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी एनडीआरएफची एक टीम पोहचली असून त्याठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारीही पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतून एनडीआरएफच्या एका टीमला एअरलिफ्ट केल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाल्यावर दृश्यमानता अतिशय कमी झाली होती. त्यामुळे याठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवणे कठीण झाले होते. पण आज सकाळीच एनडीआरफच्या टीमला याठिकाणी एअरलिफ्ट करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या टीमला लॅण्डिंगसाठीची जागा शोधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेत मदतकार्य पोहचवण्यात प्रशासनाचे संपुर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुंबईकर येऊन ठाण्यातून येऊन लोक मदत करू शकतात, पण प्रशासन पोहचू शकत नाही असाही आरोप त्यांनी केला.

तळीये गावामध्ये रात्री दरड कोसळल्याची घटना समोर आली होती. या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र सर्व पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *