Big9news Network
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेतले असताना चंदन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करून कारवाई करणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर यांचे पथक नेमले होते.
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना बातमी मिळाली की, दोन इसम त्यांच्याकडील मोटार सायकल नंबर MH 13 BS 7464 वरुन चोरलेली चंदनाची लाकडे, व लाकडे तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह मौजे हजुर ता. अक्कलकोट मार्गे इटकळकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदर बातमी प्रमाणे कारवाई करण्याकामी अक्कलकोट शहरात हजर असलेले पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथकास कारवाई करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक अक्कलकोट शहरातून निघून मौजे हब्यूर ते इटकळ जाणारे रोडवर काही अंतरावर दबा धरून बसले असताना मौजे हन्नूर गांवाकडून एक मोटार सायकल येत असताना दिसली. त्याचा बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता मोटार सायकल न थांबता तसीच पुढे निघून गेली त्यास पाठलाग करून पकडले. त्यांना पकडल्यानंतर त्यांचे कब्जातील प्लास्टिकचा पोता व पिशवी तपासून पाहिली असता पोत्यामध्ये सुगंधी चंदनाचे लाकडे व लाकडे तोडण्यासाठी लागणारे ६ लाकडी दांडके, ४ नग लोखंडी गिरमिट, १ लोखंडी कुदळ, १ लोखंडी वाकर्स, १ धार लावण्याकरीता दगड, १ करवत, २ लोखंडी कु-हाडीचे पाते, १ मोटार सायकल असा एकूण २,३१,८०० रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोहेकॉ/ ३८७ चनाजी देविदास गाडे यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरंन ५३६/२०२१ भादविसंक ३७९, ३४ प्रमाणे व भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम ४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील ०२ आरोपीतांना अटक करून त्यांना मा. न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवूल रिमांड मुदतीत गुन्हयातील चंदनाची लाकडे विकत घेणारा तिसऱ्या आरोपीस अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोसई शैलेश खेडकर हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सफ़ौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.