Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

१८ नोव्हेंबर रोजी डॉ.संदीप आडके व त्यांच्या सोलापूर विचार मंचच्या बहुसंख्य सभासदांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोमपा आयुक्त पी शिवशंकर व पोलीस आयुक्त बैजल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९० मीटर उंचीची बेकायदा को-जनरेशन चिमणी पाडून टाकून होटगी रोड विमानसेवा सुरू होण्यासाठी त्वरित हालचाली करण्याबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये १६ नोव्हेंबर रोजी मंत्रालयाच्या नगरविकास खात्याच्या अवर सचिव किशोर गोखले यांनी चिमणी पाडकाम रोखण्याबाबत राज्य सरकार सक्षम नसल्याचे तसेच याआधीच्या उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच डीजीसीए व एअरपोर्ट एथारीटी यांनी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाचा विचार करून ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने येथील आयुक्तांनी या चिमणीचे त्वरित पाडकाम करून टाकावे असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.त्यानुसारच ही बेकायदा चिमणी त्वरित पाडून टाकावी तसेच कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती नसल्यामुळे हा कारखाना जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स व परवाना नूतनीकरण करून घेत नाही तोपर्यंत त्वरित बंद करावा व होटगी रोडवरचे सुसज्ज विमानतळ त्वरित चालू करावे या प्रमुख मागण्यांचे पत्र देण्यात आले.

ही चिमणी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता तसेच शेजारीच असलेल्या एयरपोर्ट अथॉरिटी किंवा डीजीसीए यांची कोणतीही नाहरकत प्रमाणपत्र घेता बांधलेली असल्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन सर्वोच्च न्यायालयाने ही चिमणी बेकायदा ठरवली आहे तसेच दि. ३/१२/२०१९ रोजी डीजीसीए, नवी दिल्ली यांनी विमानास प्रमुख अडथळा होत असल्यामुळे तात्काळ पाडून टाकावी व त्याची अंमलबजावणी येथील जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशा स्पष्ट ऑर्डर्स दिल्या असतानासुद्धा आजतागायत केवळ धर्मराज काडादी यांच्या हट्टापायी व त्यांना येथील काही राजकीय लोकांचा वरदहस्त असल्यामुळे या चिमणीला आजतागायत अभय मिळत आले होते.परंतु आता या चिमणीची घटका पूर्ण भरलेली आहे आणि बिनीयास कंपनीला दिलेल्या वर्कऑर्डर प्रमाणे २ दिवसांमध्ये प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात होईल. धर्मराज काडादी यांच्या याचिकेस महपालिकेने क्याव्हेट दाखल केल्याने आता ते काहीही करू शकत नाहीत.सोलापूर विमान प्राधिकरण व एअरपोर्ट एथारीटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनासुद्धा पत्राद्वारे होटगी रोड विमानतळावरून चिमणी पाडताच नागरी विमान सेवा सुरू करणे बाबत पुन्हा एकदा पत्र पाठवण्यात आले आहे.

या सर्व घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सुद्धा कळविण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, सोमपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी पाडकामाची पूर्ण तयारी सुरू आहे व याबाबतीत कोणीही अडथळा आणला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देऊन आमच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरचे होटगी रोडवरचे सुसज्ज विमानतळ नागरी विमान वाहतूकीस सुरू होऊन येथून मुंबई ,बेंगलोर, तिरुपती, हैद्राबाद, चेन्नई, नवी दिल्ली अशा ठिकाणी आपली विमानसेवा देण्यास बर्‍याचशा कंपन्या उत्सुक असल्याबाबत व हे विमानतळ अतिशय जलद गतीने कार्यान्वित करण्यात करण्यात एयरपोर्ट अथॉरिटी काम करत असल्याबाबत डॉ. संदीप आडके यांनी सांगितले.यामुळे आता सोलापूरची सर्वांगीण प्रगती निश्चितच होऊ घातलेली आहे. सोलापूर विचार मंचचे संजय थोबडले,मनोज शिरसागर ,दत्तात्रय अंबुरे, श्रीकांत बनसोडे,शाम रंगरेज, लिंगराज गुडूर, शिवपुत्र काळगीकर, राजेश गोसकी, शिरीष कोल्हापुरे, जगदीश तांदळे, झवर व ह्यूमन राइट्सचे विजय कुमार डीग्गे व इतर बहुसंख्य सभासद याप्रसंगी उपस्थित होते.

विमानसेवासुरू करण्यासाठी सोलापूर आय एम ए,सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन,सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन,टेक्सटाइल डेव्हलपमेंट फाउंडेशन, क्रेडाई,स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ,अक्कलकोट,सुप्रीम ह्युमन राईट्स अँड इटीलिजन्स इंडिया वगैरे सुंस्थानी पत्राद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा दिला आहे .

सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके , संजय थोबडे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या सातत्याच्या दबावामुळे व अतिशय पद्धतशीरपणे केलेल्या पाठपुराव्यामुळे हा लढा सोलापूर विचार मंचने सोलापूर ते नवी दिल्ली व्हाया मंत्रालय असा लढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *