Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाचे तात्काळ आदेश नगर विकास विभागच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. ११ अॉगस्ट २०१७ रोजी नाशिक येथील कंत्राटदारास घेऊन सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकाम करण्यासाठी कारखाना स्थळी गेले असता कारखान्याचे कर्मचारी, संचालक आणि सभासद यांनी चितावणीखोर व्यक्तव्य करुन उपस्थितांना भडकवण्याचे कार्य केले तथा शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

परिस्थिती चिघळु नये ह्या करिता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्या कडुन हमीपत्र स्विकारले ज्यात कारखान्याच्या वतीने त्यावेळी तीन महिन्यांच्या आत स्वतः अनधिकृत बांधलेली चिमणी पाडकाम आम्ही करु असे लिहुन दिले होते. सर्व न्यायालयाने आणि सर्व संबंधित यंत्रणांनी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा म्हणून श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीच जबाबदार असल्याचा निर्वाळा दिला असूनही कारखान्याचे अध्यक्ष तथा संचालक मंडळाच्या वतीने शेतकरी तथा जनतेमध्ये चितावणीखोर व्यक्तव्य करुन भडकवणार्याचे कार्य होत असून, सोलापूरची शांतता आणि अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वेळीच बेताल वक्तव्य करणार्यांवर आणि अफवा पसरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोलापूरच्या विविध संस्था आणि संघटनेच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आले.

अमरावतीची घटना ताजी असतानाच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाची तयारी सुरू आहे त्यास व्यत्यय आण्यासाठी अनेक जण सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरुन जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करणार असून त्या करिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५,००० सशस्त्र निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात ठेवावे अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करून सदर विषय तडीस नेला आहे. सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदना दरम्यान सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, अॅड.प्रमोद शहा, आनंद पाटील, विजय कुंदन जाधव आदी उपस्थित होते. सदर निवेदनाची ईमेल प्रत सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *