Big9news Network
वीरशैव समाजाचे पाच पंच पीठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र काशी येथील जंगमवाडी मठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून बृहनमठ होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
बुधवारी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील बिसनहळी येथे उज्जैनी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सिद्धलिंग देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल्य पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 जगद्गुरु चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी
यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या बैठकीत काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची निवड जाहीर केली.
यावेळी विविध मठाचे 50 पेक्षा अधिक शिवाचार्य यांची उपस्थिती होती. होटगी मठाच्या गुरुकुलात शिक्षण घेतलेले डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांची काशी पीठ तर भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी यांची केदारपीठ , डॉक्टर सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांची श्रीशैल पिठाच्या जगद्गुरु म्हणून निवड झाली आहे. या शिवाय 100 पेक्षा अधिक शिवाचाऱ्यांची शिक्षण या मठातून घेतलेले आहेत. होटगी मठ पाचव्या शतकापासून कार्यरत असून चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांनी धर्मप्रसारा बरोबरच शिक्षणाची सेवा उपलब्ध करून दिल्या. या मठाचे मठाधिपती तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी विस्तार केला.
सिद्धांत शिखामणी वेदांत तत्व नाम गणेशणम या संस्कृत विषयात पीएचडी केली आहे. कन्नड मराठी तेलुगू हिंदी संस्कृत आणि इंग्रजी या सहा भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. सामाजिक शैक्षणिक संस्कृत आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून त्यांचे कार्य चालू आहे. शेतीविषयक त्यांना आवड असून पारंपरिक शेती बद्दल जागृती करीत आहेत काशी पिठाचे जगत काशी पिठाची उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड झाल्याने विरे समाजामधून आनंद पसरला आहे.
परमपूज्य तपोरनं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामी लिंगैक्य होताना पाहिलेले ‘संकल्पसिध्दी’चा स्वप्न ‘न भूतो न भविष्यति’ असा विलोभनिय सोहळा धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कार्यसिद्धीस नेले होते.
डॉ. मल्लिकार्जुज महास्वामी हे मूळचे जालहळ्ळी (तळवारगेरी, आंचेसुगूर, ता. देवदुर्ग, जि. रायचूर) कर्नाटक येथील असून
सौ. अक्कनागम्मा व श्री. कोडय्या स्वामी यांचे ते सुपूत्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जे.जे. शिक्षण संस्था, जालहळ्ळी
येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर तर पुढील उच्च शिक्षण ‘राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ’
तिरुपती येथे झाले. येथे अविश्रांत परिश्रम घेवून प्राक:शास्त्री व आचार्य पी.जी. डिप्लो इन योगा या परीक्षेत उत्तुंग यशाचे शिखर गाठले. वाक्प्रभुत्व असणारे महास्वामीनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले. काशी जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर
शिवाचार्य महास्वामींच्या मार्गदर्शनाने ‘सिध्दांत शिखामणी वेदान्त तत्वनाम गवेषणम्’ या विषयाची निवड केली. ‘सिध्दांत
शिखामणी’ यातील अद्वैत वेदान्त-सिध्दांत विषयावर २०१३ साली अभ्यासपूर्ण संशोधन पूर्ण केले. बाळीवेस येथील
मद्विरशैव गुरुकुल संस्कृत पाठशाला येथून त्यांच्या धार्मिक, आध्यात्मिक कार्यावर प्रसन्न होवून काशीपीठचे
ज्ञानसिंहासनाधिश्वर जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीनी त्यांना ‘धर्मरत्न’ ही नामभिदान देवून त्यांचा गौरव
केला तसेच नुकतेच बेंगलुरू कोळ्ळदमठ यांच्या कडून श्री अल्लमप्रभु पुरस्कार देवून गौरविण्या आले.
विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून भक्तांना मार्गदर्शन करून अंध:श्रध्देला फाटा देवून अखिल मानवजातीला नवी
उमेद, नवी आशेची किरणे त्यांच्या आशिर्वचनातून व कार्यातून दिसून येत आहे.