Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

अन्न व्यवसायिक वडापाव, पोहे यासारखे अन्नपदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा संपूर्ण देशात यापुर्वीच लागु करण्यात आला आहे. लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव, पोहे यासारखे अन्न पदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात, त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.

वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात. न्युजपेपरमध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करून ग्राहकांना देणे धोकादायक आहे. सर्व अन्न व्यवसायिक, हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांनी न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत कडक कारवाई घेण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि.स.देसाई यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *