Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज एकाच दिवशी 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 114 जण बरे झाले परंतु 5 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.

सोलापूर शहरात आज रविवारी दि.23 मे रोजी कोरोनाचे नवे 33 रुग्ण आढळले असून यामध्ये 16 पुरुष तर 17 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2371 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1897 निगेटिव्ह तर 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 114 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *