Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big 9 News NETWORK

सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येणार असून त्याचे उद्घाटन आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते तर आयुक्त पि.शिवशंकर, आरोग्य सभापती अनिता मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मदर तेरेसा पॉलीक्लेक्निक हॉस्पिटल(डफरीन हॉस्पिटल) येथे करण्यात आले. यावेळी उपायुक्त धनराज पांडे, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेवक सुनील भाऊ कामाटी, नगरसेविका वाहिदाबानू शेख,केतन भाई शहा, आरोग्य अधिकारी अरुंधती हराळकर, वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्‍वर सोडल, वैद्यकीय अधिकारी मंजिरी कुलकर्णी, डॉ. मंजुषा चाफळकर, डॉ. तवानगी जोग, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त धनराज पांडे यांनी केली.

मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर नागरिक रोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या, औषध हे उपचार सुरु असे पर्यत घेतात.उपचार संपल्यानंतर आपल्या जवळील गोळ्या, औषध हे तसेच पडून राहतात व नंतर ते आपण कचराकुंडीत फेकून देतो. परंतु या सर्व गोळ्या, औषध सामान्य नागरिकांसाठी व गोरगरिबांना होऊ शकतो.आपण वापरलेले गोळ्या, औषधे, सिरप यांची योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तसेच सोलापुरात सध्या सर्व लसीकरण केंद्र सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा संजीवनी सोलापूर ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. कारण या ठिकाणी लस घेण्यासाठी मोठमोठे लोक त्या ठिकाणी येत असतात. अशानेही या संजीवनी मिशन मध्ये सहभागी घ्यावे व आपल्याकडील सर्व औषधे वापरत नसलेली औषधे आमच्या केंद्राकडे जमा करावेत असे आव्हान आयुक्त पी शिवशंकर यांनी केले.महापौर श्रीकांचना यन्नम यांनी शहरातील नागरिकांना आव्हान केले की आपल्या कडे असलेले औषध आमच्या कडे द्यावे जेणेकरून ती औषधे गोरगरिबांना वापरण्यात येईल. संजीवनी सोलापूर ही मोहीम सर्व नागरी आरोग्य केंद्र तसेच लसीकरण केंद्रात सुद्धा सुरू करण्यात येणार आहे तरी या मोहिमेत सोलापूकर मोठया संख्येने सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आव्हान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *