Big9news Network
प्रशांत कुलकर्णी (पंढरपूर)
15 वर्षापूर्वी भीमा कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय भीमरावदादा यांचे चिरंजीव श्री.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडीक यांनी भीमाचे त्यावेळेचे चेअरमन आ.सुधाकरपंत परिचारक व त्यांचे सहकारी आ.राजन पाटील यांना भीमा कारखाना एक पाऊल मागे घेत दिलदारपणा दाखवत बिनविरोध बहाल केला होता याचे साक्षीदार भीमाचे सर्व सभासद आहेत.स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक व आमदार राजन पाटील यांनी त्यावेळी विस्तारीकरणाचा लहान टप्पा पूर्ण करून सभासदांच्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवत संस्था व सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन कारखान्याचा कारभार चांगला करुन दाखवला होता. म्हणूनच सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये सत्ता हव्यास व इर्षेचे राजकारण घुसले तर ते संस्थेच्या प्रगतीला मारक ठरू शकते हा प्रगल्भ विचार प्रत्यक्ष कृतीत आणून भीमा कारखान्याची ती 2006 ची निवडणूक खुद्द संस्थापक स्व.भीमराव दादा यांचे चिरंजीव असुनही बिनविरोध बहाल करून मनाचा मोठेपणा दाखवत संपूर्ण सहकार क्षेत्रापुढे एक वेगळा आदर्श ठेवला होता. त्यावेळी संस्थापक स्वर्गीय भीमरावदादा यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभा करण्याचे वचन आ.सुधाकर पंत परिचारक व आ.राजन पाटील यांनी दिले होते. खरंतर त्याच वेळी भीमा कारखाना स्वर्गीय भीमरावदादांचे चिरंजीव श्री मुन्नासाहेब यांचेकडे सोपविण्याचा सभासदांचा मनोमन पक्का निर्णय झाला होता असे.
चित्र बिनविरोध निर्णयानंतर पाठोपाठच्या सभासदांच्या भावना प्रधान प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले होते.श्री धनंजय महाडिक यांनी त्या दोघा जेष्ठ नेत्यांना निवडणूक बिनविरोध बहाल करण्याच्या त्यावेळी दाखविलेल्या त्या दिलदार,उदात्त व ऊमद्या,संयमी विचारसरणीच्या निर्णयावर सभासदां कडून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्याचप्रमाणे त्यावेळी अनेक सभासदांना अश्रूही अनावर झालेले आपण सर्वांनी पाहिले होते.आज पंढरपूरच्या परिचारक व अनगरच्या पाटील या दोन्ही घराण्यांनी श्री धनंजय महाडिक यांना त्यांच्याच वडिलांनी उभा केलेल्या भीमाची निवडणूक बिनविरोध बहाल करून परतफेड करण्याची योग्य वेळ आली आहे व त्यांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे पक्षीय पातळीसह सर्वच स्तरावर स्वागतच होईल असे मला वाटते.भीमाची निवडणूक बिनविरोध व्हावी ही भीमाच्या सर्व सभासदांची इच्छा आहे.भीमा सहकारी साखर कारखाना श्री धनंजय महाडिक यांचे वडिलांनी स्थापन केला असून त्याचा विकासही त्यांनी करून दाखवलेला आहे म्हणून ह्या कारखान्याचा कारभार सर्वांनी एकमताने धनंजय महाडीक यांचेकडेच सोपवावा ही भीमा कार्यक्षेत्रातील सभासदांच्या व परिसरातील सर्वच लोकांच्या मनात खोलवर रुजलेली एक व्यापक लोकभावनासुद्धा आहे व ह्या लोकभावनेचा सर्वांनी आदर करणं गरजेचं आहे.
आज आपणा सर्वांच्या मनावर राज्य करणारे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आमदार प्रशांत परिचारक व आमदार राजन पाटील हे दोघेही सहकारातील प्रगल्भ व अनुभवी व्यक्तिमत्व आहेत. संपूर्ण भारतातील साखर कारखानदारी पुढे निर्माण झालेल्या संकटांची त्यांना चांगली जाणीव असल्यामुळेच भीमाचे चेअरमन खा.धनंजय महाडिक यांच्यावर कुठेही टिकेचे स्टेटमेंट त्यांनी दिलेले नाही.ही बाब अत्यंत महत्वाची आहे व दखल घेण्यासारखी आहे. भीमाचे माजी व्हाईस चेअरमन व जेष्ठ मार्गदर्शक नेते श्री कल्याणराव पाटील व बचाव समितीचे अध्यक्ष माजी संचालक श्री.शिवाजीराव चव्हाण व दिलीपराव घाडगे यांनी लावून धरलेल्या शेतकऱ्यांची थकीत बिले व कामगारांचे थकित पगार द्यावे या दोन्हीही न्याय्य व रास्त मागण्या चेअरमन श्री धनंजय महाडिक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण करून दाखवल्या आहेत. तसेच सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून काळाची गरज असलेले विस्तारीकरण प्रकल्प व 25 मेगावॅटचा विद्युत निर्मिती प्रकल्प हे दोन्हीही प्रकल्प अनंत अडचणींना तोंड देत यशस्वीपणे सुरू करून दाखवले आहेत. श्री धनंजय महाडिक यांना या भरीव विकास कामाची पोहोच पावती देण्याचे भीमा सहकारी कारखान्याच्या सर्वच सभासदांनी मनोमन ठरविल्याचे चित्र सर्वत्र स्पष्ट दिसत आहे व या सौहार्दपूर्ण अशा उमद्या विचाराला सर्व ज्येष्ठ नेतृत्वांनी सुद्धा हिरवा कंदील दाखवावा अशी चर्चा भीमाच्या सभासदांमध्ये आहे.
भीमा कारखाना हा मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून तोही आपण सर्वांनी मिळून पांडुरंग व लोकनेते कारखान्याप्रमाणे बिनविरोध करून राजकारणमुक्त केला तर भीमाची व एकूणच मोहोळ पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी व भीमा कारखान्याची प्रगतीची घोडदौड सुरू झालेली दिसेल.असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. याप्रसंगी सर्व संचालक मंडळ व व्हाईस चेअरमन सतीशराव जगताप नारायण जाधव सुरेश सावंत शिवाजी गुंड पाटील सुनील चव्हाण हिंमत पाटील सिद्धू अनुसे भीमराव वसेकर दत्ता सावंत नानासाहेब पवार सज्जन पवार चरणराज चवरे भारत पाटील पांडुरंग ताटे राजन बाबर शैलाताई गोडसे हनुमंत पाटील विक्रम डोंगरे ब्रह्मदेव डोंगरे राजकुमार पाटील किसन जाधव जाकिर मुलानी पैलवान अन्सार भाई संतोष चव्हाण जमीर मुजावर, संतोष बचुटे, पैलवान पंकज चव्हाण गणेश पप्पा चव्हाण पापा चव्हाण शरद चव्हाण यशवंत चव्हाण बाबासाहेब जाधव भारत जाधव माऊली जाधव अण्णा पाटील ॲडव्होकेट रामभाऊ भोसले रामदास कोकाटे हनुमंत पवार व इतर मंडळी उपस्थित होती.
बिनविरोधच्या निर्णयामुळे द्वेषाचे राजकारण संपेल! –
भीमा ची आगामी निवडणूक पांडुरंग व लोकनेते बाबुरावआण्णा कारखान्याप्रमाणे बिनविरोध घडवून सर्वांनीच एक अविस्मरणीय व ऐतिहासिक पाऊल टाकावे व प्रत्यक्ष निवडणुकीमुळे पुढे कार्यकर्त्यांमधे निर्माण होणारे द्वेषाचे,सुडबुद्धीचे व अडवणुकीचे राजकारण व त्यातून सभासद कामगारांना होणारा त्रास टाळावा व परस्पर सामंजस्याचे वातावरण निर्माण करून सर्वांनीच भीमा कारखान्याच्या भरभराटीस हातभार लावावा.पांडुरंग सह.सा. कारखाना व लोकनेते बाबुरावअण्णा पाटील कारखाना हे दोन्ही कारखाने राजकारण विरहित असल्यामुळे त्या कारखान्यांच्या झालेल्या मोठ्या प्रगतीचं ऊदाहरण आपणा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. अलीकडेच महाडिक व पाटील गटाने कोल्हापूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळते.या निर्णयाचं सर्व स्तरावर स्वागतच होईल.
-प्रा.संग्रामदादा चव्हाण.
समन्वयक,भीमा परिवार