Big9news Network
नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर व कमल क्रांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी ठीक दहा वाजता पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. शीतल के शहा, यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये मोफत बाल रोग हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये, हृदयाची सोनोग्राफी (2D CARDIOLOGY) (Advanced GE Sonography Machine – GE Vivid T8 Pro) या मशिनद्वारे उपस्थित तज्ञ डॉक्टरांकडून मोफत निदान व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अगदी मोफत उपचार करण्यात येणार असून 0 ते १८ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा.
यामध्ये लहान मुलांना होणारे आजार बाळ निळसर पडणे, वजन न वाढणे, जोरात जोरात श्वास लागणे, दूध व्यवस्थित न पिणे, दूध पिताना कपाळावर घाम येणे, वारंवार निमोनिया होणे, ASD, PDA, VSD, हे आढळणारे आजार. हि सर्व आजारांची लक्षणे असून अशी लक्षणे असलेल्या सर्व नवजात बालकाच्या माता-पित्यांनी या शिबिरांमध्ये आपला सहभाग नोंदवून सर्व शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नवजीवन रुग्णालयाचे सुप्रसिद्ध डॉ. शितल के शहा यांनी सर्वांना केले आहे.