Big9news Network
शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी
वटपौर्णिमा हा सण म्हणजे महिलांचा आवडता सण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची मागणी करतात परंतु माढा शहरामध्ये प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने वडाच्या झाडाच्या पूजना बरोबरच शहरातील अनेक भागात वडाच्या झाडाचे रोपण करून वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली.
माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष तथा प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी माढ्यातील अनेक भागात वडाचे झाडे लाऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनल साठे, अपर्णा मेहता, गितांजली देशमुख ,कल्पना जगदाळे, सुप्रिया बंडगर, मालती शहा, अनिता सातपुते, अर्चना राऊत, रेहाना शेख , वृषाली शिंदे या सहअनेक महिला उपस्थित होत्या. प्रियदर्शनी महिला मंडळाच्या या उपक्रमाचे महिला वर्गाबरोबर शहरात मोठे कौतुक होत आहे.
Leave a Reply