Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

*पत्नीस पेट्रोल ओतून पेटवून दिल्या प्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय महादेव बन्ने यास जामीन मंजूर*

सोलापूर दि:- प्रीती दत्तात्रय बन्ने वय 32,रा:- शुभम कॉम्प्लेक्स, जुळे सोलापूर हिस पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पेटवल्या प्रकरणी अटकेत असलेला पोलीस शिपाई दत्तात्रय महादेव बन्ने यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही मोहिते यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, दि:-12/4/2021 रोजी बन्ने याच्या मोबाईल मधील फोटो त्याच्या पत्नीने डिलीट केले होते,संध्याकाळी 5:25 वाजेच्या सुमारास त्याची पत्नी घरी आल्यावर प्रियेसीच्या सांगण्यावरून तिस मारहाण करून अंगावर पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची फिर्याद त्याच्या पत्नीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती.त्यावर बन्ने यास अटक झाली होती.
त्यावर जामीन मिळणेसाठी पोलिस शिपाई बन्ने याने ऍड.मिलिंद थोबडे यांच्या मार्फत जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता ,घटना घडल्या बाबतची विश्वासार्यता वाटत नसल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 30,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
*यात अर्जदार तर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकार तर्फे ऍड.दत्ता पवार यांनी काम पाहिले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *