Big9news Network
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या 27 तारखेला होणाऱ्या जनसंवाद सभेच्या नियोजनासाठी हद्दवाढ विभागातील सकल मराठा समाजाची बैठक गोविंदश्री मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस सकल मराठा समाजाचे मुख्य मार्गदर्शक राजन जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार दत्तामामा मुळे प्रा. गणेश देशमुख, प्रा.जी.के. देशमुख, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब मोरे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलताना प्रा. गणेश देशमुख म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल तर ते फक्त केंद्र सरकार देऊ शकते तो राज्याच्या विषयात राज्याच्या अखत्यारीतील विषय नसून तो केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजां च्या मागे आपली ताकत उभी केली करणे गरजेचे आहे कारण छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या राजकीय भवितव्य पणाला लावून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा मराठा समाजातील प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे की आपण संभाजीराजांच्या मागे उभे राहिले पाहिजे यासाठी दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी प्रशाला येथे बहुसंख्येने येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमामध्ये माऊली पवार म्हणाले की आरक्षण किती गरजेचे आहे आणि आरक्षण गेल्यापासून समाजातील एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी शासनाने शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. यावेळी प्राजक्ता बागल उदय शिंदे स्वप्निल काळे यांनी मनोगत व्यक्त केले सदर बैठकीस नाना साठे विशाल ताकमोगे मिलिंद भोसले, बालाजी चौगुले, नानासाहेब गोरे, चेतन चौधरी, अरविंद शेळके, सिताराम बाबर, अनिल कोकाटे, संजय भोसले काशिनाथ माने, बाळासाहेब फाळके, हणमंत पवार, अविनाश फडतरे स्वप्निल काळे उमेश सातपुते प्राजक्ता बागल अमिता जगदाळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्याम कदम तर आभार प्रदर्शन हेमंत पवार यांनी केले.
Leave a Reply