परंडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मानसिंह गुलाबसिंह ठाकूर यांचे वयाच्या 85 वर्षी अल्प आजाराने दुखःद निधन.
परंडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मानसिंह गुलाबसिंह ठाकूर यांचे वयाच्या 85 वर्षी अल्प आजाराने दुखःद निधन झाले आहे.ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री सुजितसिंह ठाकूर यांचे वडील होत.
दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटे 3 वाजता निधन झाले.परंडा येथील बावची रोडवरील स्मशानभूमीत आज मंगळवारी दूपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे, पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार असून ,भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री सुजितसिंह ठाकूर , भाजपाचे परंडा नगर परिषद मधील गटनेते श्री सुबोधसिंह ठाकूर यांचे ते वडील होते,मानसिंह ठाकूर यांच्या निधनाने शहर, तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, शहर व परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.