Big9news Network
सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या स्ट्रीट बझार येथील 20 गाळे आणि 15 खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या गाड्यासाठीची जागा भाड्याने देण्यासाठी ऑफलाइन लिलाव दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता स्ट्रीट बाजार या ठिकाणी करण्यात येणार आहे.
सदरची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. सदर 20 गाळेपैकी मध्ये 7 गाळे कापड/गारमेंट्स/वस्त्र; 3 गाळे ज्वेलरी;5 गाळे कलाकुसरीच्या वस्तू; 5 गाळे बंद पाकीट मध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ यासाठी राखून ठेवलेले आहेत. त्याच बरोबर 15 खाद्य विक्रेते करणाऱ्या गाड्यासाठी मोकळी जागा राखून ठेवलेली आहे. सदरच्या गाळ्यांमध्ये 1 गाळा दिव्यांगसाठी आरक्षित केलेला आहे.या लिलावमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश फी 500 रुपये इतकी ठवण्यात आलेली आहे.सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी 3 आयकार्ड साइझचे फोटो,आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ऍक्ट लायसन्स यांच्या स्व-साक्षांकित प्रती घेऊन उपस्थित राहावे.याबाबत अधिकच्या माहितीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता या विभागाशी कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा.