‘ऐ,नीचे उतर’ | हायवेवर टायर काढून लूटमार करणारी टोळीचा खेळ खल्लास ; ग्रामीण LCBची कारवाई

Big9news Network

राष्ट्रीय महामार्गावरील वाहने आडवून त्यांचे टायर काढून लुटमार करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद गुन्हयातील ट्रकचे 10 डिस्कसह टायर, गुन्हयात वापरलेली वाहने, मोबाईल व इतर साहित्यासह एकूण 24 लाख 05 हजार 200 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

यातील फिर्यादी अजितसिंग बाबुलाल रा. भोलडा, पोस्ट. मोहना, ता. जि. पलवल, रा. हरीयाणा हा चेन्नई येथून अशोक लेलॅंन्ड कंपनीचे नवीन चेस मीक्षर घेवून सुरत, राज्य-गुजरात येथे जाण्याकरीता निघाले असता दि.13/10/2021 रोजी पहाटे 04ः45 वा. चे सुमारास मौजे-कंदलगांव,ता.दक्षिण सोलापूर येथे आले असता 7 ते 8 अनोळखी इसमांनी त्याचे वाहन आडवून त्यास ‘‘निचे उतर’’ असे सांगीतले व त्यापैकी एकाने त्यास गाडीखाली ओढले व एक जण त्याच्या गाडीमध्ये गाडी चालविण्यासाठी बसला. त्या लोकांनी यातील फिर्यादीस बाजूला घेवून त्यास हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधून ‘‘तु आवाज किया तो खतम कर देंगे’’ असे म्हणून गाडी ही रोडपासून अंदाजे 100 मीटर अंतरावर पडीक शेतामध्ये घेवून जावून गाडीचे 10 टायर डिस्कसह काढून, डिझेल, बॅटरी, टुलबॉक्स, मिक्षर पाईप तसेच मोबाईल व रोख रक्कम इ. साहित्य जबरदस्तीने काढून घेवून सदर अनोळखी इसमांनी त्यांचेसोबत आणलेल्या रोडच्या बाजूस उभा केलेल्या दुस-या एका मोठया ट्रकमध्ये सदर साहित्य घेवून गेले व यातील फिर्यादीस तेथेच सोडून निघून गेले म्हणून यातील फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीवरून मंद्रुप पोलीस ठाणे गुं.र.न.378/2021 भा.द.वि.का.क 395 प्रमाणे दिनांक 13/10/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा राष्ट्रीय महामार्गावर घडल्याने, सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हे शाखेचे व मंद्रुप पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून, सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांनी सपोनि नागनाथ खुणे व पोसई शैलेष खेडकर यांचेसह 01 पथक तयार करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी, तसेच त्यांना गुन्हेगारांच्या गुन्हयाची पध्दत व सदर मार्गावरील सी.सी.टी.व्ही. फूटेजची तपासणी करण्याकरीता सूचना दिल्या. त्याप्रमाणे दोन्ही अधिकारी यांनी सदर मार्गावरील सर्व सी.सी.टी.व्ही. फूटेजची पाहणी करून काही संशयित वाहन त्यांना मिळून आले. सदर वाहनाबाबत अधिक माहिती घेवून व गोपनीय बातमीदार यांचेकडून माहिती मिळाली की, सदर गुन्हयात खामकरवाडी, पोस्ट-तेरखेडा, ता. वाशी,जि. उस्मानाबाद येथील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे निश्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी, सपोनि नागनाथ खुणे व पोसई शैलेष खेडकर यांचे पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथक हे खामकरवाडी, पोस्ट-तेरखेडा, ता.वाशी, जि. उस्मानाबाद येथे जावून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली. सदर गुन्हयातील 06 आरोपीं हे गुन्हयात वापरलेल्या वाहनासह सोलापूर तुळजापूर रोडवरील शितल हॉटेल ता. उत्तर सोलापूर जवळ हायवे लगत थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता, तात्काळ मंद्रुप पोलीस ठाणेचे सपोनि नितिन थेटे, व गुन्हे षाखेचे सपोनि नागनाथ खुणे, पोसई शैलेष खेडकर यांनी पथकासह त्याठिकाणी जावून आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले, त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता, त्यांनी सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता, त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. सदर गुन्हयात वापरलेले वाहन व गुन्हयातील मुद्देमाल, त्यांचे इतर साथीदार यांचेबाबत माहिती दिली. सदर गुन्हयातील वापरलेले वाहन व चोरीस गेलेला मुद्देमाल सपोनि नितिन थेटे व गुन्हे शाखेकडील सपोनि नागनाथ खुणे व पोसई शैलेष खेडकर यांनी ताब्यात घेतला असून त्याची किंमत व वर्णन खालील प्रमाणे.

01 ) 5,00,000/- क्रुझर गजग्या रंगाची जिप
02) 16,00,000/- एक अषोक लिलेंड कंपनीचा ट्रक
03) 41,000 /- 04 विवो व 01 रेडमी कंपनीचे मोबाईल
04) 200/- पांढ-या धातुचे ब्रासलेट.
05) 1000/- लोखंडी जॅक
06) 2,00,000/- जे.के. कंपनीचे 10 टायर डिस्कसह.
07) 15,000/- 01 अपोलो कंपनीचा टायर डिस्कसह.
08) 15,000/- 01 बीटी कंपनीचा टायर डिस्कसह.
09) 5000/- 01 टायरची लोखंडी डिस्क.
10) 25,000/- 02 एक्साईड कंपनीच्या बॅट-या.
11 ) 3,000/- 01 विवो कंपनीचा मोबाईल.

एकूण 24,05,200/-

सदर आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 30/10/2021 पर्यंत 07 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून, त्यांचेकडून आणखीन गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाणेचे सपोनि नितीन थेटे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्षनाखाली, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली, मंद्रुप पोलीस ठाणेचे सपोनि नितिन थेटे, गुन्हे शाखेचे सपोनि नागनाथ खुणे, पोसई शैलेष खेडकर, सफौ श्रीकांत गायकवाड, महिला पोलीस अंमलदार मंजूळा धोत्रे, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, लाला राठोड, अक्षय दळवी, मनोहर माने, धनराज गायकवाड, अजय वाघमारे, अमोल जाधव, सफौ. जालिंदर दळवी, संभाजी मानखेडे, व मंद्रुप पोलीस ठाणेचे अविनाश पाटील, राहूल महिंद्रकर, चालक सुनंद स्वामी यांनी बजावली आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम , अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव सर यांचे मार्गदर्शनाखाली व वपोनी सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली, सदरचे detection करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागनाथ खुणे आणि PSI शैलेश खेडकर यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून दिवसरात्र तपास करून फक्त 10 दिवसात संपूर्ण गेला माल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात एकूण 6 आरोपी एकाच वेळी अटक करून सुमारे 24 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.