Big9news Network
सोलापूर विजापूरला जाणाऱ्या केगाव ते हत्तूर या २२ किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता फेब्रुवारीपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. यातील मंगळवेढा रोड ते हत्तूर मार्गाचे काम झाले आहे. चार-पाच दिवसांत येथे वाहतूक सुरू होणार आहे. तर केगाव वळणावरील उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू झाली आहे.
सोलापूर ते विजापूर महामार्ग चौपदरीकरण सुरू आहे. त्यात या बाह्यवळणाचे काम केले जात आहे.मंगळवेढा रोडला रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. याला पूर्ण होण्यास एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. केगाव ते मंगळवेढा रोड आणि मंगळवेढा रोड ते हत्तूर असे रस्त्याचे किरकोळ काम राहिले आहे. ते होताच मंगळवेढा रोड ते हत्तूरपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
मात्र रेल्वे पुलाचे काम झाल्यावर पूर्ण २२ किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली. केगाव वळणावर उड्डाणपूल उभारले जात आहे. त्यासाठी सोलापूर ते पुणे आणि पुणे ते सोलापूर या वाहतुकीसाठी पर्यायी उपरस्ता करण्यात आला. दोन महिन्यांनंतर पुलाखालून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे काम पूर्ण होताच पुणे मार्गावरून आलेली वाहतूक विजापूर रोडकडे या पुलावरून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात जडवाहतूक येण्याचे प्रमाण कमी होईल.
Leave a Reply