Big9news Network
लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यात गुरुवार, दि. २९ जुलै रोजी कोठेही लसीकरण होणार नाही, असे आरोग्य विभागाने कळविले आहे. जिल्ह्यासाठी दोन दिवसांपूर्वी आलेली लस संपली आहे. आरोग्य उपसंचालकांकडे आणखी लसीची मागणी करण्यात आली आहे. मनपा आरोग्य विभागानेही याबाबत सूचना जारी केली आहे.
बुधवारी विडी कारखान्यांना सुट्टी असल्याने लसीकरण सत्र आवश्यक होते, असे मत अनेक कामगारांनी व्यक्त केले आहे. पण, साठा संपल्याने लसीकरण करता आलेले नाही. आता लस आल्यानंतर शुक्रवारी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येईल, असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Leave a Reply