Big9news Network
सोलापूर जिल्याची हद्द वगळून, ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्या पासून ते दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी रात्री 8 वाजे पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 37 (3) चे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
तसेच 28 डिसेंबर 2021 रोजीचे सकाळी 8 वाजल्या पासून ते दिनांक 11 जानेवारी 2022 च्या रात्री 8 वाजे पर्यंत मिरवणुका काढण्यास, सभा घेणेस पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात, तसेच ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरिक्षक यांनी दिलेल्या पूर्वपरवानगीला हे आदेश लागू होणार नाहीत.