लोकमंगल फौंडेशनच्या शिक्षकरत्न, उपक्रमशिल शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Big9news Network

लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणार्‍या शिक्षकरत्न पुरस्कारांसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व स्तरावरील शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 11 शिक्षकांना शिक्षकरत्न आणि दोन शाळांना उपक्रमशिल शाळांचा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार तथा निवड समिती सदस्य अरविंद जोशी आणि डॉ. ह.ना. जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

किमान 12 वर्षे सेवा झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, वरिष्ठ महाविद्यालयीन, क्रीडा आणि कलाशिक्षकांना या पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहेत. उपलब्ध होणार्‍या प्रवेशिकांतून प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्रत्येकी दोघांना पुरस्कार दिले जातील. वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक प्रत्येकी एक, अशा 9 शिक्षकांना पुरस्कार  दिले जाणार आहेत.  ज्यांनी विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविले असतील किंवा अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला असेल अशा एका शिक्षकालाही पुरस्कार दिला जातो.

शिवाय एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षकाला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.  अडीच हजार रूपयांची पुस्तके आणि सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेला आणि महापालिकेच्या एका शाळेला कोरोना काळातील उपकमशील शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

तरी शिक्षकांनी आणि शाळांनी आपले प्रस्ताव व अर्ज लोकमंगल फाऊंडेशनच्या प्राथमिक शिक्षक
https://tinyurl.com/ShikshakRatna-Primary माध्यमिक शिक्षक
https://tinyurl.com/ShikshakRatna-Secondary, कनिष्ठ महाविद्यालय
https://tinyurl.com/ShikshakRatna-JRcollege, वरिष्ठ महाविद्यालय
https://tinyurl.com/ShikshakRatna-SRcollege, उपक्रमशील शाळा
https://tinyurl.com/Lokmangal-UpakramsheelShala

संकेत स्थळावर किंवा  विकास नगर येथील कार्यालयावर 15 ऑगस्टपर्यंत आणून द्यावेत. अधिक माहितीसाठी 0217- 232480 आणि 9657709710, 7774883388  येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  या पत्रकार परिषदेला निवड समितीचे सदस्य डॉ. आशालता जगताप, देवानंद चिलवंत, राजकिरण चव्हाण आदी उपस्थित होते.