पूरग्रस्तांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पाठवली मदत

BIG 9 NEWS NETWORK

एक हात मदतीचा……
एक हात कर्तव्याचा…..
एकच चर्चा युवा मोर्चा……

#पुरग्रस्तांना सोलापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पाठवली मदत

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महापुराने लोकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. नागरिकांचे घर, दुकान हे अक्षरशः पावसात वाहून गेले. हे बघून माणूसकीच्या नात्याने सोलापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सातारा येथील पूरग्रस्त भागात मदत पाठविण्यात आली. तेथील लोकांना तातडीची गरज ही अन्न, पाणी, जीवनावश्यक वस्तूंची आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 1200 पाण्याची बाॅटल, २५०० बिस्किटांची पाकिटे, 500 सॅनिटायजर ,300 किलो रवा,350 किलो तांदूळ,1000 टूथ पेस्ट,500 ब्लॅंकेट,अशा प्रकारची मदत राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते झेंडा दाखवूनपाठविण्यात आले

यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस शशी भाऊ थोरात,भाजपा भटके-विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष अमोल दादा गायकवाड,दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर,भारतीय जनता युवा मोर्चाचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमने,प्रदेश OBC मोर्चा सोशल मीडिया सदस्य अशोकजी कोडम,शिलवंत छपेकर विशाल बनसोडे,डोंगरेश चाबुकस्वार, अंबादास पामु,रोहन मराठे,रोहित कोळकुर,विठ्ठल सरवदे,निखिल सावळगी,भास्कर बोगम,रोहित परीट,यांची उपस्थिती होती.

मदतकार्याचे संकलन भाजयुमोचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने,डोंगरेश चाबुकस्वार,रोहन मराठे,रोहित कोळकुर,विशाल बनसोडे,ओम होमकर,संदीप महाले,निखिल सावळगी,भास्कर बोगम व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी केले.