Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

स्मार्टसिटी निकृष्ट दर्जेच्या कामाची शासनस्तरावर चौकशी करण्याबाबत

शहरातील रस्त्याच्या बाजूचे न बुजलेले खड्डे इलेक्ट्रिक, टेलिफोन यांच्या वायरिंग अंडरग्राऊंड न टाकल्याने फुटपाथचे काम अर्धवट सोडून दिले आहे. शहरातील काही भागात रस्ते पूर्ण झाले तरी 30% लहानमोठी कामे शिल्लक राहिले आहेत. काही ठिकाणी उंची वाढवल्याने पावसाळ्यात पाणी दुकान व घरात घुसत आहे. काही ठिकाणी 30 फुटाचा रास्ता असताना त्यात फुटपाथ 15 फुटाचे करण्यात आले आहे. काही फुटपाथ रस्त्यालगत समान उंचीचे असल्याने फुटपाथ व रास्ता यामधील साम्य दिसत नाही. रस्त्यावरील इलेक्ट्रीसिटी पोल फुटपाथच्या 5 फूट मागे बसवायचे सोडून थेट फुटपाथवर बसवून भविष्यात अतिक्रमणाला शह देण्यासाठी चुकीचे काम सुरू आहे.

लाखो रुपये खर्चून सिद्धेश्वर मंदिरासमोरील रास्ता ते MIT कॉलेज जाण्याच्या रस्त्यावर मागिल वर्षी इलेक्ट्रॉनिक पोल बसवण्यात आले. बसवलेले पोल चांगले असताना पुन्हा ते काढून लहान पोल बसवण्यात आले. त्याच बरोबर मागील वर्षी सिद्धेश्वर मंदिर जवळील फडकुले सभागृह समोर मागील वर्षी 25 लाख रु खर्चून सार्वजनिक मुतारी बसवण्यात आले. परंतु या मुतारीचा त्रास होत असल्याने मुतारी काढण्यात आले. जिल्हा परिषद लगत असलेल्या पोलीस चौकी जवळील शौचालय एका वर्षांपासून बंद आहे. असे अनेक ठिकाणी अर्धवट कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरात इलेक्ट्रिक पोल नवीन असताना पुन्हा नविन मक्तेदाराला नविन पोल व पोल वरील फुलपाखरू नव्याने करण्यासाठी टेंडर काढण्यात आले. सोलापूरातील जिल्हा न्यायालयात कोट्यवधी रुपये खर्चून सोलर पॅनल लावण्यात आले. परंतु स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे महावितरणचे कनेक्शन न दिल्यामुळे आजवर सोलर पॅनल बंद अवस्थेत आहे. आजवर शहरात पूर्ण केलेले कामे महापालिकेला हस्तांतरण केले नसून कोणते काम पूर्ण झालेले आहे याची माहिती सादर करावे.

शहरात अनेक भागात निकृष्ट कामांची तक्रार दाखल करून शहरवासीयांना चांगली सेवा पुरवण्यासाठी आपत्कालीन सेवा म्हणून कोणतेही ऑफिस अथवा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आले नाही. त्याचबरोबर देशभरात सर्व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे संकेतस्थळ असून दररोज कामाची माहिती व इतर कामे त्या संकेतस्थळावर दररोज अहवाल सादर केला जातो. पण सोलापूर शहराच्या जवळील पुणे स्मार्ट सिटीचे वेबसाईट असून सोलापूर स्मार्ट सिटीचे वेबसाईट तयार नाही. नागरिकांच्या झालेल्या गैरसोय बद्दल तक्रार करण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने सर्वाना स्मार्टसिटीच्या बोगस कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटीची कामे सक्षम मान्यता नसताना अनेक कामे बोगस मान्यता घेऊन कामे करण्यात आले आहे. टेंडर देताना डिलरला कामे दिले असून डिलर ने अनधिकृत पद्धतीने सबडिलरला कामे देण्यात आले आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींना कामे दिल्याने अनेक ठिकाणी बोगस काम सुरू आहेत यावर चौकशी करून वेळेतच कारवाई करण्यात यावे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रसरकार, राज्यसरकारच्या अनुदानातून स्मार्टसिटीचे काम सुरू असताना काही भागात महापालिकेतून भाग भांडवली निधीतून अनधिकृत दोन वेळा दोन्ही बाजूने पैसे जास्त खर्ची दाखवण्यात आले आहे. शहराच्या कन्ना चौक व जोडभावी पेठ परिसरात अनेक बोगस नळ कनेक्शन जोडण्यात आले असून शहरात आणखी किती बोगस नळ बसवण्यात आले आहे याची चौकशी करून संबंधित अधिकारी व मक्तेदारावर कारवाई करण्यात यावे. स्मार्टसिटीच्या हद्दीतील कामे इतर भागात मक्तेदाराकडून अनधिकृत कामे करून घेतले असून त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावे. बाळीवेस भागातील मल्लिकार्जुन मंदिराजवळ झालेल्या ड्रेनेज कनेक्शन मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन गेली असून याची कोणीही दखल न घेता रास्ता काँक्रीटकरण करण्यात आले. कन्ना चौक भागातील रास्ता काँक्रीटकरण झाले असून अवघ्या सहा महिन्यातच सिमेंट निघून आतील खडी दिसत असल्याचे आढळून आले आहे. काही भागातील रस्ते सिमेंटचे मंजूर झाले असताना डांबरीकरण करण्यात आले व काही ठिकाणी डांबरीकरण असताना काँक्रीटकरण करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या कामाची मुदत संपल्याने कोणतेही दंड आकारण्यात आले नाही. काही लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही कोणीच या विषयाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले नाही.

या सर्व प्रकरणाची संपूर्ण शासन स्तरीय चौकशी करून बेजबाबदार मक्तेदाराला व अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात यावे. आजवर झालेल्या अपघातामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून आणखी किती निष्पक्ष नागरिकांचे बळी जाणार? सातत्याने पाठपुरावा करून पालिका आयुक्त व स्मार्ट सिटी सीईओ यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहे. परंतु आजवर कोणतीही दखल न घेतल्याने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. स्मार्ट सिटी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील सुंदर योजना आहे मात्र सोलापुरात या योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे त्यामुळे या योजनेत आजवर झालेला खर्च.. त्या कामाची गुणवत्ता.. याबाबत केंद्राच्या तसेच राज्याच्या पथकाकडून तपासणी करावी आणि संबंधीत अधिकाऱ्याला बडतर्फ करावे गरज नसलेली कामे करुन कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे अत्यंत चांगले रस्ते खोदून अत्यंत खराब केली आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेल्या पैशात मोठा भ्रष्टाचार झाला आहे

देशात आणि सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना शहरात सर्व निकृष्ठ दर्जेचे काम करून भाजपाला काळिमा फासणारे काम स्मार्ट सिटी सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील करत आहेत. जर कामे चांगल्या दर्जेचे न झाल्यास आपल्यावर चौकशी लावण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे व तुम्हाला शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. शहरातील विकासाला खिळ बसल्याने लवकरच जिल्हा नियोजन ऑफिस जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन करताना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर याचे नियोजन व वापर करत शिस्तबद्ध पद्धतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक,माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *