भारत नगर जुना विडी घरकुल परिसरात राहणारा तौसिफ शेख वय 26 हा तरुण 19 जुलै पासून बेपत्ता होता. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस या तरुणाचा शोध घेत होते.
अखेर हा तरुण पुण्यात सुखरूप आढळून आला आहे. घरातील कर्ता युवक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतातुर झाले होते. मात्र अखेर मुलगा सुखरूप घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चव्हाण, गायकवाड आणि मुल्ला यांनी ही कामगिरी केली आहे.