Big9news Network
मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, पुढील चार दिवस ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाऱ्याचा वेगही अधिक असून, ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ३ ऑगस्ट रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ४ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ ऑगस्ट रोजी रायगडसह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईत याच काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Leave a Reply