Big9news Network
आज दि.29 जुलैच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 548 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज गुरुवारी 29 जुलै रोजी ग्रामीण भागातील 548 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 341 पुरुष तर 207 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 522 आहे. यामध्ये 296 पुरुष तर 226 महिलांचा समावेश होतो. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 9816 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 9268 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.