नवी दिल्ली – भारतीय रेल्वे(Indian Railway)ने दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर sr.indianrailways.gov.in जाऊन अर्ज देऊ शकतात. १ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून ३० जूनला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.(Indian Railway Recruitment 2021)
याचसोबत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16
या लिंकवर क्लिक करून पदांसाठी अर्ज करू शकतात. या जाहिरातीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE या लिंक वर क्लिक करा. या भरतीअंतर्गत ३ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात ९३६ कॅरिज वर्क्स, ७५६ रिक्त गोल्डनरॉक वर्कशॉप आणि १६८६ सिग्नल तसेच टेलिकॉम वर्कशॉप पदासाठी अर्ज करू शकता.
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जून २०२१ पासून सुरू होऊन ३० जून २०२१ पर्यंत संपेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ३० जून २०२१ आहे. उमेदवारांकडे १० वी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे. त्याशिवाय उमेदवारांसाठी वयोमर्यादा १५ ते २४ वयोगट ठेवण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आला आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही.