सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला होता. सध्याही संसर्ग कमी झालेला असला तरी धोका टळलेला नाही. कोरोना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सामाजिक संघटना प्रयत्न करीत आहेत. आज हिंदूरक्षक मित्र मंडळाच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर व कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले होते.
यावेळी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीस स्थानिक रहिवाशांनी प्रतिसाद दिला. यावेळी सोळा जणांची चाचणी करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे सर्व कोरोना चाचण्या या निगेटीव्ह आल्या अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
डाँं.सोनाली महिद्रकर ,देगाव वैद्यकीय केंद्र प्रमुख व डाँ.वैशाली आगावणे, शेखर फंड, बजंरग आवताडे यांच्या शुभहस्ते व यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अमोल पवार, बळीराम जांभळे, दिपक पेटकर, सोमनाथ वाघमोडे, अमर चांदणे, निलेश शिंदे, जय गायकवाड, संतोष बनसोडे ,दत्ताञय शिंदे, शशिकांत गायकवाड, शेखर सातपूते, देवा नागने, जयवंत पवार, वैभव वानखरे आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कोरोना मुक्तीसाठी संकल्प…
प्रत्येकाने आपल्या विभागात कोरोना मुक्तीसाठी संकल्प करणे गरजेचे आहे. या संकट समयी आरोग्याची काळजी घेणे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य शिबिर राबविण्यात आले होते.
शेखर फंड, संयोजक