Big9news Network
सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 5 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही.
सोलापूर शहरात आज बुधवारी दि.30 जून रोजी कोरोनाचे नवे 8 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 3 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 1237 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1229 निगेटिव्ह तर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 5 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. कोरोनामुळे आज एकही जणांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
Leave a Reply