Big9news Network
आज दि.30 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 371 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज बुधवारी 30 जून रोजी ग्रामीण भागातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 210 पुरुष तर 161 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 338 आहे. यामध्ये 183 पुरुष तर 155 महिलांचा समावेश होतो. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 10,165 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 9794 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.