Big9news Network
23 जून पासून सोलापुरातून गायब झालेली बहुप्रतिक्षित ती उद्या आपल्या सोलापुरात दाखल होत आहे. तरुणांपासून वृद्धांना हिची प्रतीक्षा लागून राहिली होती.अशी आरोग्यदायी लस अखेरीस उद्या सोलापुरातील केंद्रांवर लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
लस उपलब्ध नसल्याने सोलापूरला कोणी वाली नाही का.? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात होता. Mh13 न्यूजने याबाबत आवाज उठवला होता.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर , अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, यांच्यासह समन्वयक अनिरुद्ध पिंपळे यांच्याकडे बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. कालच महापालिका आयुक्तांनी पुणे विभागाला पत्र पाठवून मागणी केली असल्याचे सांगितले होते.
जितक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होईल इतक्या प्रमाणावर कोरोना रोखायला यश मिळेल. असे ही त्यांनी सांगितले होते.
उद्या शहरातील या केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे.