Big9news Network
शासनामार्फत सर्वच कोरोना रुग्णांवर सरसकट मोफत उपचार करावे अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी ईमेल द्वारे निवेदन देऊन केली आहे.
सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, कोरोना आजाराने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात गंभीर स्वरूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालय व शासनामार्फ़त पात्र असलेल्या सर्व खाजगी रुग्णालयात नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार होत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना पात्र रुग्णालयाची संख्या हाताच्या बोटावर मोजन्याएवढीच आहे आणि सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासकीय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत तेवढे बेड नाहीत त्यामुळे कोरोना रुग्ण इतरही खाजगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर सुरुवातीस डिपॉझिट भरण्यास सांगितले जाते ही रक्कम प्रत्येक रुग्णालयात वेगळी आहेत त्यानंतर औषधे इंजेक्शन तात्काळ घेऊन येण्यास सांगितले जाते भीतीपोटी रुग्णांच्या नातेवाइकांकडून कोणत्याही ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करून महागडी औषधे उपलब्ध केली जातात. हॉस्पिटलचे बिल ही लाखो रुपये होत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प, रोजगार बुडाले, नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत अशा परिस्थितीतीचा विचार करून शासनामार्फ़त सर्वच कोरोना रुग्णावर प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्येही सरसकट मोफत उपचार करण्यात यावेत जेणेकरून पैश्याअभावी कोणत्याही कोरोना रुग्णांचा जीव उपचाराअभावी जाऊ नये.
तरी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी या निवेदनाचा विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा ही नम्र विनंती असे निवेदन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे देण्यात आले.