Big9news Network
सोलापूरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड तुटवडा जाणवत आहे. जनतेच्या सेवेसाठी प्रभाग 3 मध्ये लवकरच कोरोना हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे. सोमवारी सकाळी पालिका उपायुक्त धनराज पांडे व नगरसेवक सुरेश पाटील यांनी भवानी पेठेतील अथर्व गार्डन, जयभवानी बगिचा, श्री वीरतपस्वी हायस्कुल,माहेश्वरी सांस्कृतिक भवन, रेवम्मा पाटील मंगल कार्यालयात पाहणी करून पुढील उपाययोजना सुचवण्यात आली.
सोलापूरात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड साठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. परंतु नागरिकांनीही वेळोवेळी काळजी घेण्याची गरज आहे. आजार अंगावर काढले की रुग्णांची संख्या वाढणार व बेड शिल्लक राहणार नाही. वेळेतच न घाबरता टेस्ट केल्यास शहरातील वाढती संख्या, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर वर येणारा भार कमी होईल. अशी माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नागरिकांमध्ये भीती आहे की टेस्ट केले तर पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल. पण असे काही नसून कोणतेही आजार न लपवता जवळच्या नागरी आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करावे. लक्षणे कमी असतील तर कोरोना केअर सेंटर मध्ये ठेवले जाईल. आणि उशिरा केल्यास कोरोनाचा त्रास सुरू होईल आणि ऑक्सीजन व व्हेंटिलेटर बेड वर अधिक ताण येईल. दुसर्यांना काही झालं नाही म्हणून मी पण बाहेर फिरणार हे मनातून काढून टाकावे. कारण कोरोनाचे विविध लक्षणे असून त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व नियम पाळावे. घरी राहून प्रशासनास सहकार्य केल्यास नक्कीच कोरोना कमी होण्यास मदत होईल. कोनातेही आजार न लपवता वेळीच काळजी घेऊन उपचार करा असे आव्हान उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले आहे.
याप्रसंगी हॉस्पिटलसाठी लागणारे साहित्य पालिकेच्या वतीने देणार असून खर्च व इतर साहित्यांबाबत बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रसंगी महापालिकेचे पाटील, पवार ,अक्षय पाटील, लिंगराज पाटील उपस्थित होते.
बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरसाठी नागरिकांनी हॉस्पिटल न फिरत आमच्या www.solapurmuncipalcarporation.com या संकेत स्थळावर भेट देऊन bed available वर क्लिक केल्यास संपूर्ण माहिती क्षणात समोर दिसेल. त्याव्यतिरिक्त आणखी माहिती हवी असेल तर कोव्हिड केअर सेंटर च्या नंबर वर फोन करून माहिती मिळवू शकता.
धनराज पांडे, पालिका उपायुक्त, सोलापूर