Big9news Network
आज दि.3 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 540 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज गुरुवारी 3 जून रोजी ग्रामीण भागातील 540 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 290 पुरुष तर 250 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 919 आहे. यामध्ये 485 पुरुष तर 434 महिलांचा समावेश होतो. आज 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 15,536 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 14,996 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.