Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

महेश हणमे /9890440480

सोलापुरातील कडक निर्बंध शिथील करा, असा आक्रमक पवित्रा सोलापूकरांनी घेतल्यानंतर मनपा प्रशासनास उशीराने का होईना जाग आली. त्यामुळे आता दुपारी दोनपर्यंत सोलापूर अनलॉक राहणार आहे. तब्बल ६० दिवसानंतर सर्व दुकाने, बाजारपेठा, उद्योग, व्यवसाय आजपासून सुरू करण्यास परवानगी मिळाली असून यानिमित्ताने दोन महिने ठप्प असलेली रोजीरोटी देखील चालू होणार आहे. अखेरीस व्यापाऱ्यांचा लढा यशस्वी झाला.

१ जूनपासून राज्य सरकारने काही जिल्ह्यातील कडक निर्बंध शिथील केले होते. पण सोलापूर शहरात राज्य सरकारने दिलेल्या नियमांचा अडसर होत असल्याने मनपा आयुक्तांनी जैसे थे स्थिती ठेवली होती. दरम्यान, राजकीय पक्ष सरसावले, व्यापारी संघटना आक्रमक झाल्या, जवळपास सर्वांनीच आपली राजकीय आणि संघटनात्मक ताकद वापरली.आवाज थेट मंत्रालयात गेला. सोशल मीडियावर टीकेचे पडसाद उमटत होते. अखेरीस सोलापूर अनलॉक होण्‍यास मुहूर्त लागला. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शासन दरबारी प्रयत्न करून विशेष प्रशासकीय अधिकार प्राप्त करून घेतले.आणि आज शुक्रवार असून शहर अनलॉक झाले आहे.

व्यापारीवर्गाने आंदोलनाचा मार्ग हाताळला. पुढारी रस्त्यांवर उतरले , मनपा गेट समोर व्यापार्‍यांच्या डोळ्यातील अश्रू सांडले .सोलापूरकरची जनताही त्रासली होती. रोजी बंद, मग रोटी तरी कशी मिळणार? असा सवाल ‘गाजला’. सरतेशेवटी मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांना सर्व परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आज ४ जूनपासून १५ जूनपर्यंत निर्बंध शिथील केल्याचे गुरुवारी रात्री त्यांनी जाहीर केले.

त्यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, आस्थापना, उद्योग, कारखाने यांना सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडण्यास मुभा दिली आहे. सोलापुरात विडी, गारमेंट, यंत्रमाग हे मुख्य रोजगाराचे साधन आहेत. त्यांनाही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कामगारवर्गाला दिलासा मिळाला आहे. गेले ६० दिवस कामगारांची रोजी रोटी बंद पडली होती.

दुपारी तीन नंतर संचारबंदी

सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत व्यवसाय, उद्योगास परवानगी दिली, त्यानंतर दुपारी ३ पासून शहरात संचारबंदी राहणार आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही.

पार्सल सेवा राहणार सुरू

हॉटेल, बार यांची पार्सल सेवा दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत देण्यास परवानगी दिली आहे.

दारूविक्रीस परवानगी

नव्या सुधारित आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने, व्यवसाय वगळता अन्य दुकाने मात्र शनिवार आणि रविवार बंद ठेवावी लागणार आहेत, मात्र आठवड्यातील सातही दिवस दारू दुकाने उघडण्यास आणि विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे दारू विक्री व्यवसाय अत्यावश्यक, जीवनावश्यक वर्गात मोडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *