Big9news Network
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या परवानाधारक रिक्षाचालकांना 1500/- रुपये अनुदान मिळावा याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सोय सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर करण्यात आली. त्याचा शुभारंभ कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आले.
रिक्षाचालकांच्या अनुदानासाठी कॉंग्रेसने केली ऑनलाईन अर्जाची सोय
MH13 News Network
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या परवानाधारक रिक्षाचालकांना 1500/- रुपये अनुदान मिळावा याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सोय सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर करण्यात आली. त्याचा शुभारंभ कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी रिक्षा चालकांना आवाहन केले की राज्यात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने परवानाधारक रिक्षाचालकांना अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ थेट रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे या लाभासाठी सर्व परवाना धारक रिक्षाधारकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज पडताळणी करून चालकांच्या खात्यात मंजूर अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. याकरिता रिक्षाचालकांना संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मोफत सोय सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आली आहे. तरी सर्व परवानाधारक रिक्षाचालकांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून याचा लाभ घ्यावा.
यावेळी सेवादल प्रदेश पदाधिकारी अशोक कलशेट्टी, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, माजी नगरसेवक हारून शेख, वाहिद नदाफ, वैभव शेटे , मनोज डीग्गे, परवानाधारक रिक्षाचालक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.