BIG 9 NEWS
सोलापुर – रविवारी सोलापुर शहरात मराठा आक्रोश मोर्चा होता. त्यापार्शवभूमीवर सोलापुर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून बैठकांचे नियोजन सुरू होते. आ.नरेंद्र पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक राम जाधव व किरण पवार यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांना सहभागी व्हावे अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनाही सांगितले होते. मोर्चामध्ये आम्ही मोठ्या संख्येने सहभागी होऊ असे आ. देशमुख यांनी म्हटले होते व त्याप्रमाणे मोर्चाचा समारोप होईपर्यंत आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते.
सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी म्हटल्या प्रमाणे सर्व नगरसेवकांसह मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. भाजपचे सरकार असताना गेल्यावेळेस झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये भाजपच्या नगरसेवकांसह सर्व पक्षतील समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते. परंतु यावेळेस ठाकरे सरकारने मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. जागो जागी बॅरिगेटिंग, बाहेर गावातून येण्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी व ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिली.