Big9News Network
आज रविवारी 4 जुलै रोजी होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चा च्या बंदोबस्तासाठी छत्रपती संभाजी राजे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरास छावणीचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आलेले असून, शहराकडे येणाऱ्या रस्त्याची नाकेबंदी करण्यात आलेली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रविवारी संपूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली असून पुणे उस्मानाबाद लातूर सातारा सांगली आणि सोलापूर येथील ग्रामीण भागातून तब्बल तीन हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात दाखल झालेला आहे. काल रात्री उशिरा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोर्चास कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नसल्याचा व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने रद्द झालेले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील महामंडळ याचे माजी अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Leave a Reply