आज दि.13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 925 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज मंगळवारी 13 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 925 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 528 पुरुष तर 397 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 484 आहे. यामध्ये 306 पुरुष तर 178 महिलांचा समावेश होतो .आज 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 8288 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7363 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.