Big9news Network
आज दि.5 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 460 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज शनिवारी 5 जून रोजी ग्रामीण भागातील 460 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 282 पुरुष तर 178 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 582 आहे. यामध्ये 310 पुरुष तर 272 महिलांचा समावेश होतो. आज 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 13,377 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 12,917 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.