सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 180 जणांची नोंद घेण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 328 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून 15 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.
लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.6 मे रोजी कोरोनाचे नवे 180 रुग्ण आढळले असून यामध्ये 104 पुरुष तर 73 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 2316 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1645 निगेटीव्ह तर 180 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 328 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. कोरोनामुळे आज 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.