आज दिनांक 3 मे रोजी सोलापूर महावितरण मधील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विलगीकरण कक्षाचे उदघाटन सोलापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर उदघाटन प्रसंगी प्रभारी अभियंता श्री दिघे साहेब तसेच, उपकार्यकारी अभियंता श्री मुंजी साहेब,व्यवस्थापक संजय गायकवाड,लेखा अधिकारी विवेक ओझा, जमादार साहेब होते.
सदर विलगीकरण स्थापनेसाठी वीज वितरण कंपनी मधील संघटनांनी यास आर्थिक मदत केली. त्यांच्या सहकार्याने 10 बेडचे सदर कोरोना विलगिकरन कक्ष स्थापण्यात आले.सदर विलगिकरन कक्ष करण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक विद्युत कर्मचारी संघटना, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,इंजिनियर्स असोसिएशन,लाईनस्टाफ असोसिएशन,इंटक इत्यादी संघटनांनी आर्थिक मदत केली. असून गरजू नि त्याचा लाभ घ्यावा असे प्रशासनाने तसेच सर्व संघटनांनी आव्हान केले आहे सदर विलगिकरन कक्ष सोलापूर शहर उपविभाग क(सिव्हिल सबस्टेशन) येथील अधीक्षक अभियंता यांचे निवासी कवाटर्स मध्ये करण्यात आलेले आहे सदर उदघाटन प्रसंगी विजयकुमार राकले, सुनील गायकवाड, विलास कोले, मुजावर साहेब, गौरेश पाटील,एन डी चव्हाण,पोताजी जाधव,सलगर मॅडम कटकधोंड,लौरेन्स डोंगरे,अंबुरे, इत्यादी उपस्थित होते