सोलापुरात कडक लॉकडाऊन ;असे आहेत आदेश

महेश हणमे-9890440480

सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह मुख्य प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोलापूर शहर व जिल्ह्यात आठ मे च्या रात्री आठपासून 15 मेच्या सकाळी सात पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मेडिकल दुकानधारकांनी ओळखपत्र वापरणे बंधनकारक आहे. किराणा दुकान ,भाजीपाला ,फळांची दुकाने, दूध विक्री हॉटेल पार्सल सेवा आठ मे ते 15 मे दरम्यान पूर्णपणे बंद राहतील.

केवळ वैद्यकीय कारण अथवा लसीकरण वगळता कोणत्याच कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. पेट्रोल पंप आणि बँका सुरू राहतील परंतु पेट्रोल पंपावर सर्वसामान्य व्यक्तींना पेट्रोल विक्री करता येणार नाही असे बंधन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार असणार आहे.

मेडीकल दुकाने आणि आरोग्य सेवा वगळता इतर गोष्टी साठी निर्बंध कडक केले आहेत.त्यामुळे भाजी पाला विक्रीसह किराणा दुकाने हाॕटेल,माॕल, बिअर दुकाने वाईनशाॕप बेकरी,आडत दुकाने,खाजगी आस्थापना बंद राहणार आहेत तर कृषी दुकाने सुरु राहतील त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.

बँकेत सुद्धा अत्यावश्यक कामे सुरु राहतील असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले याबाबत पुढील आदेश लवकरच निघणार आहे.