सोलापूर,दि.6: सधन कुक्कुट विकास गट या योजनेसाठी माढा तालुक्यातून अद्याप प्रस्ताव आला नाही, इच्छुक लाभार्थ्यांनी 25 मे 2021 पर्यंत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र माढा तालुक्यातून एकही प्रस्तावा आला नाही. लाभार्थांना शासनाचे 50 टक्के अनुदान एकदाच देय असेल. प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रूपये एवढी असून यावर 50 टक्के अनुदान राहणार आहे.
इच्छुक लाभार्थींनी पंचायत समिती माढा येथील पशुधन विकास अधिकारी किंवा लगतच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून विहित अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा. परिपूर्ण अर्ज पंचायत समितीकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.