BIG 9 NEWS NETWORK
सोलापुरातील यश नगर व निराळे वस्ती येथील जांभळे परिवाराच्यावतीने शनिवारी श्री संत सावतामाळी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गुलालाचे कीर्तन पार पडले. ह.भ.प. अभिमन्यू डोंगरे महाराज यांनी हे गुलालाचे कीर्तन केले. श्री संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती नगरसेवक देवेंद्र कोठे , ह भ प सुधाकर इंगळे महाराज, शेखर फंड यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय केसरे,बजरंग डांगे महाराज, माऊली बेलेराव ,आदर्श इंगळे, ऋषिकेश झांबरे महाराज, कृष्णा चवरे यांची उपस्थिती होती . उपस्थित मान्यवरांचा सत्कार जांभळे परिवाराच्या वतीने चंद्रकांत जांभळे, पांडुरंग जांभळे, सुभाष जांभळे, तुकाराम जांभळे यांनी केला.
Leave a Reply