●स्मार्ट सिटीच्या कामात होत असलेल्या दिरंगाई वरून आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त शिवशंकर तसेच स्मार्टचे CEO ढेंगळे पाटील यांची केली कानउघाडणी.
●स्मार्ट सिटी व अमृत योजनेची कामे वेळेत आणि दर्जेदार करा अन्यथा दोघांचीही गय केली जाणार… आमदार देशमुख.
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये सावळागोधळ दिसून येत आहे .शहरातील सर्वच रस्ते खोदुन ठेवण्यात आले आहेत यामुळे सोलापूर शहरवासियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याचबरोबर अमृत योजनेतून टाकण्यात येणारी ड्रेनेज लाईनचे कामही संथ गतीने व निकृष्ट होत असल्याबाबत जाब विचारण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांच्या नवी पेठेतील संपर्क कार्यालयात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम,सभागृहनेते शिवानंद पाटील, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे पाटील, नगर अभियंता संदिप कारंजे, नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सोलापूर शहरात पहिल्या टप्प्यात 16 ठिकाणी स्मार्ट सिटीची विविध कामे सुरू आहे त्यापैकी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात स्मार्ट सिटी अंतर्गत दहा कामे सुरू आहेत .तसेच अमृत योजनेअंतर्गत शहरात मुख्य ड्रेनेज लाईन टाकण्याचे कामही सुरू आहे. स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयामध्ये समन्वय नसल्याने अनेक तक्रारी आमदार देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या भाजपाच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमध्ये अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे अनेक कामे पूर्ण होण्यास उशीर लागत आहे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याची बाबी समोर आली आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदुन ठेवण्यात आले आहेत ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर खोदाई करून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे कामामध्ये सातत्य व समन्वय नसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात शहरात होत आहेत मुख्य बाजारपेठ असलेल्या नवीपेठेतील सर्व रस्ते खोदनण्यात आले आहेत त्यामुळे व्यापारी वर्गातही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे नवी पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आमदार विजयकुमार देशमुख यांनी तातडीने स्मार्ट सिटी अधिकारी अमृत योजनेचे अधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्यासमवेत तातडीने बैठक घेतली या बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे पाटील यांना चांगलेच खडे बोल सुनावत धारेवर धरले. स्मार्ट सिटी ची कामे वेळेत करा अधिकाऱ्यांमधील मतभेद विसरून शहर विकासासाठी एक दिलाने काम करा सर्वच कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा महापालिका आयुक्त पी शिवशंकर व स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे पाटील यांची गय केली जाणार नाही आम्ही महापालिकेत सत्तेत असलो तरी जनतेला जर अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे चांगल्या सोयी व सुविधा उपलब्ध होत नसतील तर जनते साठी आम्ही रस्त्यावर देखील उतरण्यास तयार आहोत त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून तातडीने सर्व कामे पूर्ण करावेत अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिल्या.
येत्या दोन महिन्यात स्मार्ट सिटी च्या पहिल्या टप्प्यातील सर्वच कामे मार्गी लावून देण्याचे आश्वासन स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिले.
अमृत योजनेचे काम व चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्याची ग्वाही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या कामात होत असलेल्या दिरंगाई मुळे व कामात सातत्य नसल्याने आमदार विजयकुमार देशमुख यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.