Latest Post

“1win Casino Resmi Site, Bahis Ofisi, Slotlar, Oyun Makineler ️ 1win En Côte D’ivoire ᐈ Rome Sportifs Et Sobre Casi
  • विचाराने मोठ्या झालेल्या नेतृत्वाची छाप कुणीही पुसू शकत नाही : पुरुषोत्तम बरडे
  • गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या प्रयत्नातून २५ लाखाच्या रस्ते कामाचा शुभारंभ

सोलापूर – प्रामाणिकपणे एखादा विचार, तत्व घेऊन चालत मोठं झालेलं नेतृत्व आणि त्याच्या कार्याची छाप कुणीही पुसू शकत नाही. गुरुशांत धुत्तरगांवकर हे असंच विचाराने चालणारं नेतृत्व असून शहराला अशा निरपेक्षपणे काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केलं. गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलितेत्तर निधी जिल्हास्तर योजना सन १९-२० मधून आकाशवाणी केंद्राजवळील ज्योती नगर व श्रीदेवी नगर येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब, जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शंकर अण्णा चौगुले, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, युवासेना शहर युवाधिकारी विठ्ठल वानकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल इक्बाल अ. रशीद शेख, उपशहरप्रमुख बाळासाहेब माने, उपशहरप्रमुख रविकांत कांबळे, प्रसिद्धीप्रमुख निरंजन बोद्धुल, धनराज जानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बरडे म्हणाले की, केवळ गटार, पाणी, रस्ते अशी विकासकामेच तर गुरुशांत पूर्वीपासून करत आलेत, यापुढेही करत राहतील. परंतु, कोवीड सारख्या महामारीच्या काळात स्वतःच्या कुटुंबाचीही परवा न करता जास्तीतजास्त वेळ रुग्णालयांमध्ये फिरत, रुग्णाला बेड उपलब्ध करुन देण्यापासून प्रसंगी अत्यंविधी करायची वेळ आली तर तिथंपर्यंत सोबत राहण्याचे काम करत गुरुशांतने माणुसकीचे दर्शन घडविले आहे

.याप्रसंगी बोलताना गणेश वानकर म्हणाले की, केवळ प्रभागातीलच नव्हे, तर शहरातील विविध भागातील प्रश्नांवर पालिकेच्या सभागृहात आवाज उठविणारे गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या कार्यपध्दतीमुळे निश्चितच या भागातील कष्टकरी नागरिकांच्या जीवनात आनंदाचे दिवस येतील. तर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण म्हणाले की, प्रत्येक अडीअडचणीत नागरिकांसाठी धावून जाणारे गुरुशांत धुत्तरगांवकर यांचे काम पाहता शिवसैनिक कसा असावा ? तर गुरुशांत सारखा असावा असंच म्हणावं लागेल.स्वागत व प्रास्तविकपर भाषणात बोलताना गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले की, निवडून आल्यापासून आजतागायत सगळा निधी केवळ पाण्याच्या पाईपलाईनसाठीच दिला आहे. स्वतःच्या घराजवळ सुविधा करुन घेण्यापेक्षा प्रभागात जिथे समस्या अधिक आहेत, तिथे काम करण्यावर भर दिला. माझ्या प्रयत्नातून होत असलेला हा पहिलाच रस्ता असून काम दर्जेदार होण्याकडे लक्ष देईन. दलितेत्तर निधी पहिल्यांदाच या भागात आणल्याचा आनंद व्यक्त करतानाच याचे श्रेय जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या संतोष अष्टगी यांचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी प्रभागातील सुनील बळी मालक, सचिन भाऊ गंधुरे, कोळप्पा विटकर, अमर बोडा, राहुल गंधुरे, आनंद भाऊ मुसळे, दत्ता विटकर, अमित गडगी, सिद्धेश्वर घोडके, मल्लिकार्जुन सातलगांव, जयराम सुंचू, भरत आकेन, उमेश जेटगी, विष्णु शिंदे, देवा विटकर, देवीदास कोळी, नरेंद्र क्षीरसागर, पिंटू भैरामडी,सतीश ठाकरे, भोजराज निरंजन, कोळप्पा अलकुंटे, डॉ. हिरसकर, अरविंद टेके सर, तिपण्णा चंदा, हिटनळ्ळी काका, बसवराज सावळ्गी, राजेंद्र पवार, हिरेमठ, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनिल मालक जमादार, सिद्धाराम खजुरगी, केदार बरगाले, सिद्धू उडचाण, प्रसाद कदम, फिरोज सय्यद, कादर कोडले, नागेश लिंबितोटे,शंकर अंजंनाळकर, नागू कुंभार,तुकाराम चाबूकस्वार, दत्ता सनके, शिवा कांबळे, मल्लू नंदर्गी, इम्रान पठाण, कुमार नक्का, प्रभाकर होळीकट्टी, पवन देसाई, हरी घाटे, दीपक पवार, आनंद पांगुडवाले, तम्मा अलकुंटे, सागर शिंदे, दिगंबर विटकर, राजू येमुल, अनिल बगले, सुनील देवकर, श्रीकांत, महादेव हकके, अरुण अंगडी, दाऊ देशमुख, राहुल शिंदे, श्रेयस ठाकरे, राजेश गाजुल, सिद्धेश्वर ठेंगळे-स्वामी, अमोल साखरे, ईश्वर घोडके, जमीर नदाफ, सुनील पांचाळ, किरण सिदमल, गणेश निरंजन, संजीव यंगल, गजानन केंगनाळकर, आनंद किट्टद, नीलेश सुरवसे, बसवराज जमखंडी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल साखरे, आभार राहुल गंधुरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *