सर्वसामान्य जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन : सखाराम साठे

गावातील तळागाळातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यावर विश्वास दाखवून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन, असे मत सखाराम साठे यांनी व्यक्त केले.

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सोलापूर जिल्हा सचिव सखाराम साठे (सर) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यानिमित्ताने मराठा सेवा संघ व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचावतीने नूतन ग्रामपंचायत सदस्य सखाराम साठे सर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना होते.

या सत्कार सोहळ्यात नूतन सदस्य श्रीकांत टेकाळे सर यांच्याबरोबर पॅनलमधील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करुन त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. संजय जाधव, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष सदाशिव पवार, मेष्टा संघटनेचे गणेश निळ, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जिवन यादव, कार्याध्यक्ष दत्तात्रय मस्के, लक्ष्मण वाघमोडे, भिमराव चव्हाण, अक्षय शहा, वैजिनाथ केदार, संतोष साठे, महेश अंबुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.